येत्या मंगळवारी शिवसेनेची मुंबईत राष्ट्रीय कार्य कारिणीची बैठक होत आहे.त्यामध्ये आदित्य ठाकरे यांची नेते पदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. याच कार्यकारिणी बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्षप्रमुख पदावर फेरनिवड केली जाणार आहे. पक्षप्रमुख पदानंतर शिवसेनेत नेते पद हे महत्वाचं पद आहे. सध्या पक्षात 8 नेते आहेत. नेत्यांची संख्या वाढवण्याचीही शक्यता व्यक्त होतेय.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews